Homeराजकीयअविनाश ब्राम्हणकर यांच्या रूपाने मिळणार का नवा आमदार ?

अविनाश ब्राम्हणकर यांच्या रूपाने मिळणार का नवा आमदार ?

अविनाश ब्राम्हणकर यांच्या रूपाने मिळणार का नवा आमदार ?

साकोली/ राज्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच शेतमजूरांसोबत शेतात राबणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याला आमदारकीची उमेदवारी मिळाली आहे. शेती व्यवसायासोबतच समाजकारणाची ओढ असलेला व मागील २८ वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध माध्यमांतून सक्रीय असलेल्या सर्वसामान्य उमेदवारास भारतीय जनता पार्टीने आमदारकीची उमेदवारी देऊन निवडणूकीच्या पिचवर पहिला चौका मारला आहे.

अविनाश ब्राम्हणकर यांची साधी राहणी, आकर्षक व्यक्तिमत्व, मनमिळाऊ स्वभाव, त्यांचा कवेलूंचा घर, कोणताही बडेजाव नसणे, जनतेत सहज मिसळन्याचा त्यांचा गुण व जनतेला सहज उपलब्ध होत असल्यामुळे सामान्य जनता आपसूकच त्यांच्याकडे आकर्षित होते. विधानसभेच्या निवडणूकीत त्यांच्याकडे क्षेत्राच्या विकासाचा व्हिजन खूप मोठा असून वाखाणण्याजोगा आहे.

राज्यात अनेक आमदार आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच आमदारकीत स्वतःच्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विकासाची अनेक भरीव कामे केली आहेत. तिकडे तुमसरातही राजू कारेमोरे यांनी त्यांच्या पहिल्याच पाच वर्षात विकासकामांचा सपाटा लावला. परंतु साकोली विधानसभा क्षेत्रात २५ वर्षांपासून नंतर दोन पूल बनले असून या क्षेत्राचे आमदार हाच विकास आहे असे सांगत आहेत. त्यामुळे भंडारा व तुमसरची तुलना केली तर साकोलीत विकासाची माशी कुठे शिंकली हे समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांचा मागील २५ वर्षांपासूनचा कार्यकाळातील मोजमाप स्वतः जनता करू लागली आहे.

त्यामुळे नवीन विचार, नवीन चेहरा व नवीन उर्जा साकोली विधानसभा क्षेत्रात यायला पाहिजे, फक्त कामच नाहीत तर वैचारिक बदल सुद्धा झाला पाहिजे, वेगवेगळ्या नवनवीन कल्पना साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरीता आली पाहिजे. त्याशिवाय आपल्या भागाचा विकास होऊ शकत नाही. ही भावना साकोली विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या मनात आहे. त्यामुळे भंडारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष साकोली विधानसभाकडे लागून असल्यामुळे अविनाश ब्राम्हणकर यांच्या रूपाने नवा आमदार मिळणार का याची प्रचंड उत्सुकता जनतेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“कदाचित आम्हाला आवश्यक आहे …”: सुश्री धोनी सीएसकेच्या ‘पुनर्बांधणी प्रक्रिया’ मध्ये डोकावून पाहण्याची ऑफर...

आयपीएल 2025 दरम्यान कृतीत एमएस धोनी© एएफपी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार सुश्री धोनी यांनी मंगळवारी पुढच्या वर्षी पुनर्बांधणीच्या प्रक्रियेने चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये विसरण्यायोग्य...

जयपूरमधील आदिम येथे, प्राचीन भारतीय पाककला एका ठळक नवीन मार्गाने मध्यभागी स्टेज घेते

जयपूरची दोलायमान संस्कृती आणि शाश्वत अन्न परंपरा इंद्रियांसाठी मेजवानी ठरली आहे - परंतु आता एक रोमांचकारी नवीन खेळाडू आहे जो गोष्टी हलवित आहे. आदिम...

error: Content is protected !!