लाखनी भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या लाखनी येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक 5-11-2024 ला दुपारी दोन वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश भाडबुद्धे यांच्या हस्ते पार पडते याप्रसंगी स्वतः उमेदवार अविनाश ब्राम्हणकर,बाजार समितीचे सभापती शिवराम गिऱ्हेपुंजे,बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे,डॉक्टर झिंगरे, तु.रा.भुसारी,श्यामबापू खेडीकर, डॉ.सुदाम शहारे,विनायक बुरडे,रेखाताई भाजीपाले,त्रिवेणी पोहरकर,उमराव आठोडे, श्रावण कापगते,नागेश वाघाये, धनु व्यास, जितेंद्र बोंद्रे व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. साकोली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांच्याविषयी आपुलकीची भावना ठेवून एकनिष्ठेने त्यांच्या पाठीशी राहून ही निवडणूक जिंकून आणू असा जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये होता.
